26 एप्रिल 2012 सनई चौघडे वाजले आणि शुभ मंगल सावधान चा गजर सर्व मंडपात पसरला , शुभाशीर्वादाच्या अक्षता आणि सात वचनाची सप्तपदी संपन्न झाली आणि 23 वर्षापासून कुमारी आरती भारत जाधव असलेली मी सौ. आरती संजय गवळी (भोसले) झाले . या दिवसाने फक्त नाव नाही बदलले , संपूर्ण नवा प्रवास आणि नवी नाती सुरू झाली . कोणताही प्रवास सोपा नसतो हे त्या दिवशी माहित नव्हतं , पण त्या दिवशी फक्त आनंद एवढाच होता की मी ज्या प्रवासाला निघाले होते तिथपर्यंत मी पोहचले होते , मी ज्याच्यासाठी सगळ्या जगाशी लढले होते तो आता फक्त माझा होता . याच्याहून निराळे समाधान या जगात नाही . आज लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाले . त्यानिमित्ताने थोडे .... 💞👩❤️👨
सध्या इंस्टाग्राम वर एक reel trend मध्ये आहे. 👉 "मी त्या जबाबदार मुलाची बायको आहे ज्याने आपले शौक पूर्ण करण्याच्या वयात घरची सर्व जबाबदारी अंगावर घेतली आहे " . ही reel माझ्या बाबतीत संपूर्ण खरी आहे. बायको म्हणून सर्व गोष्टी जवळून अनुभवल्या आहेत. एका नव्या प्रवासाला निघालेली मी प्रवासवर्णन तर करायलाच पाहिजे . घरचा मोठा आणि कर्ता पुरुष म्हणून त्याला काय काय करावं लागले आहे त्याची वर्णने शब्दात मांडता येणार नाहीत आणि तसही या कर्त्या पुरुषाला त्याने आमच्यासाठी काय केलं आहे हे बोलून दाखवण्यात कोणताच मोठेपणा वाटत नसतो , त्याची छोटी अपेक्षा एवढीच असते त्याच्यावर कोणतेही आरोप लावण्यापेक्षा त्याला समजून घेतलं जावं , आपण ज्यापद्धतीने त्याच्याकडून अपेक्षा करतो तसंच त्यालाही काही अपेक्षा आहेत . कर्त्या पुरुषाला रडायचा मार्ग नाही , पण त्यालाही भावना आहेत , त्यालाही आपलं प्रेम पाहिजे , त्याची ही तारीफ करणारं कोणीतरी हवं आहे , त्यामुळे My Dear Sanju I am always there for you Forever to the ♾️
तो कसा आहे ? हे जरी आपण त्याला विचारलं तरी त्याचा चेहरा खुलतो , त्यालाही एक खांदा पाहिजे असतो relax होण्यासाठी , तो मी कायम तयार ठेवते , रागात , वैतागात, त्याच सगळ ऐकून घेते . सगळी वर्ष कशी भराभर संपली असे आज वाटते पण , आम्ही आमची लग्नाची नव्याने सुरू झालेली वर्षं कशी घालवली हे फक्त आम्हालाच माहित आहे , त्याचे आम्ही साक्षी आहोत आणि आज विश्वास बसत नाही , या सगळ्या त्रासातून मार्ग काढत आम्ही काही यशाचे टप्पे पार पाडले आहेत . अजूनही शिखर गाठायच बाकी आहे , आम्ही दोघे सोबत असलो की ते सुद्धा होईल यावर माझा विश्वास आहे .
भेटवस्तू , खान पान , चैन, मौज , मजा याहीपेक्षा मला आवडते तुझं तासनतास न कंटाळता माझ्यापाशी बसून रहाणं , माझ्याशिवाय चहा न पिणे, माझ्यासोबत comedy reels बघणं, बोलणं, मला कशावरून ही ओरडलास तर दुसऱ्या मिनिटाला मला हसवणं , मी एक Teacher असल्यामुळे माझी proffesional life कशी असली पाहिजे यावर मला advice देणं, माझ्या भरोशावर संपूर्ण घर सोडून जाणे, वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाचा हट्ट न करता शांतपणे जे मी बनवेल ते खाणं .... , जेवण सर्वांच एकाच पंगतीला झालं पाहिजे ते गरम असो किंवा थंड आणि खूप साऱ्या adjuestme करणे , four-wheeler शिकण्याकरता आणि सर्वच प्रकारच्या गोष्टीत माझा आत्मविश्वास वाढवणे , तुझ्या या support मुळे कोणीही चुकीची व्यक्ती दारात आली तर मी त्याच्यावर आवाज चढवून बोलायला शिकले , कारण तुला भावलेले शिवाजी महाराज तू स्वतः जगतोस आणि आम्हालाही जगायला भाग पाडतो.
असो , या सर्व गोष्टी सुरूच राहणार आहेत , आहे त्या गोष्टीत आनंद मानून पुढे चालत राहणे याची आम्हाला सवय झाली आहे , कारण संजय ने प्रत्येक वेळी आपल्या पेक्षा इतरांचा विचार जास्त केला आहे , आणि सात वचनाच्या बंधनाचे पालन करत मी त्याच्या मागे चालत आले आहे , आणि तसेच आम्ही दोघेही physics master असल्यामुळे Maths खूप perfect शिकवू शकतो, कदाचित त्यामुळे मला असे वाटते आम्हाला let's Consider या शब्दाची सवय झाली आहे , कारण physics मध्ये कोणतंही expression let's Consider ने start होते आणि maths मधे recurring digit division ला ignore केलं जाते थोडसं तसंच consider आणि ignore करण्याची आम्हाला सवय झाली आहे , त्यामुळे आम्हाल कोणत्याही परिस्थितीत तक्रार न करता आनंदी राहता येते .
थोडस माझ्या फॅमिली बद्दल पण बोलेन , जगातले सर्वात सुंदर स्वभावाचे सासुसासरे आणि नणंद बाई लाभल्यामुळे या प्रवासात त्यांची अडचण कधीही वाटली नाही उलट साथ मिळत राहिली , आणि देवाने खूप हुशार , चुणचुणीत , बहुगुणी अस बाळ दिल्यामुळे पालकत्व fully enjoy केलं. आमच्या लग्नाचा album अजुन आम्हाला मिळाला नाही त्याची एक वेगळीच story आहे. तरीही सगळा लग्नसोहळा आहे असा डोळ्यासमोर उभा आहे , तुझा नजरेचा इशारा , खाणाखुणा आणि आपल्याला झालेला आनंद माझ्या नजरेत आजही कैद आहे ❤️
Happy Anniversary To You Dear Partner Sanju 💞👩❤️👨 सगळं काही तुझ्यापाशी सुरू तुझ्यापाशी समाप्त Love You🥰





