Saturday, April 25, 2026

पंधराव्या वर्षात पदार्पण

 26 एप्रिल 2012 सनई चौघडे वाजले आणि शुभ मंगल सावधान चा गजर सर्व मंडपात पसरला , शुभाशीर्वादाच्या अक्षता आणि सात वचनाची सप्तपदी संपन्न झाली आणि मी 23 वर्षापासून कुमारी आरती भारत जाधव असलेली मी  सौ. आरती संजय गवळी (भोसले) झाले . या दिवसाने फक्त नाव नाही बदलले , संपूर्ण नवा प्रवास आणि नवी नाती सुरू झाली . कोणताही प्रवास सोपा नसतो हे त्या दिवशी माहित नव्हतं , पण त्या दिवशी फक्त आनंद एवढाच होता की मी ज्या प्रवासाला निघाले होते तिथपर्यंत मी पोहचले होते , मी ज्याच्यासाठी सगळ्या जगाशी लढले होते तो आता फक्त माझा होता . याच्याहून निराळे समाधान या जगात नाही . आज लग्नाला 14 वर्ष पूर्ण झाले . त्यानिमित्ताने थोडे .... 💞👩‍❤️‍👨

 सध्या इंस्टाग्राम वर एक reel trend मध्ये आहे. 👉 "मी त्या जबाबदार मुलाची बायको आहे ज्याने आपले शौक पूर्ण करण्याच्या वयात घरची सर्व जबाबदारी अंगावर घेतली आहे " . ही reel माझ्या बाबतीत संपूर्ण खरी आहे. बायको म्हणून सर्व गोष्टी जवळून अनुभवल्या आहेत. एका नव्या प्रवासाला निघालेली मी प्रवासवर्णन तर करायलाच पाहिजे . घरचा मोठा आणि कर्ता पुरुष म्हणून त्याला काय काय करावं लागले आहे त्याची वर्णने शब्दात मांडता येणार नाहीत आणि तसही या कर्त्या पुरुषाला त्याने आमच्यासाठी काय केलं आहे हे बोलून दाखवण्यात कोणताच मोठेपणा वाटत नसतो , त्याची छोटी अपेक्षा एवढीच असते त्याच्यावर कोणतेही आरोप लावण्यापेक्षा त्याला समजून घेतलं जावं , आपण ज्यापद्धतीने त्याच्याकडून अपेक्षा करतो तसंच त्यालाही काही अपेक्षा आहेत . 

 तो कसा आहे ? हे जरी आपण त्याला विचारलं तरी त्याचा चेहरा खुलतो , त्यालाही एक खांदा पाहिजे असतो relax होण्यासाठी , तो मी कायम तयार ठेवते , रागात , वैतागात, त्याच सगळ ऐकून घेते . सगळी वर्ष कशी भराभर संपली असे आज वाटते पण , आम्ही आमची लग्नाची नव्याने सुरू झालेली  वर्षं कशी घालवली हे फक्त आम्हालाच माहित आहे , त्याचे आम्ही साक्षी आहोत आणि आज विश्वास बसत नाही , या सगळ्या त्रासातून मार्ग काढत आम्ही काही यशाचे टप्पे पार पाडले आहेत . अजूनही शिखर गाठायच बाकी आहे , आम्ही दोघे सोबत असलो की ते सुद्धा होईल यावर माझा विश्वास आहे . 

          असो , या सर्व गोष्टी सुरूच राहणार आहेत , आहे त्या गोष्टीत आनंद मानून पुढे चालत राहणे याची आम्हाला सवय झाली आहे , कारण संजय ने प्रत्येक वेळी आपल्या पेक्षा इतरांचा विचार जास्त केला आहे , आणि सात वचनाच्या बंधनाचे पालन करत मी त्याच्या मागे चालत आले आहे , आणि तसेच आम्ही दोघेही physics master असल्यामुळे  आणि Maths खूप perfect शिकवू शकतो, कदाचित त्यामुळे मला असे वाटते आम्हाला let's Consider या शब्दाची सवय झाली आहे , physics मध्ये कोणतंही expression let's Consider ने start होते आणि  maths मधे recurring digit division ला ignore केलं जात थोडसं तसंच consider आणि ignore करण्याची आम्हाला सवय झाली आहे , त्यामुळे आम्हाल कोणत्याही परिस्थितीत तक्रार न करता आनंदी राहता येते . 

           थोडस माझ्या फॅमिली बद्दल  पण बोलेन , जगातले सर्वात सुंदर स्वभावाचे सासुसासरे आणि नणंद बाई लाभल्यामुळे या प्रवासात त्यांची अडचण कधीही वाटली नाही उलट साथ मिळत राहिली , आणि देवाने खूप हुशार , चुणचुणीत , बहुगुणी अस बाळ दिल्यामुळे पालकत्व fully enjoy केलं.

         आमच्या लग्नाचा album अजुन आम्हाला मिळाला नाही त्याची एक वेगळीच story आहे. तरीही सगळा लग्नसोहळा आहे असा डोळ्यासमोर उभा आहे , तुझा नजरेचा इशारा , खाणाखुणा आणि आपल्याला झालेला आनंद माझ्या नजरेत आजही कैद आहे ❤️


Happy Anniversary To You Dear Partner Sanju 💞👩‍❤️‍👨 सगळं काही तुझ्यापाशी सुरू तुझ्यापाशी समाप्त Love You🥰


No comments:

Post a Comment

पुर्ण अपुर्ण

पंधराव्या वर्षात पदार्पण

  26 एप्रिल 2012 सनई चौघडे वाजले आणि शुभ मंगल सावधान चा गजर सर्व मंडपात पसरला , शुभाशीर्वादाच्या अक्षता आणि सात वचनाची सप्तपदी संपन्न झाली ...