Happy Anniversary Mummy Pappa
लग्नाचा वाढदिवस ही पूर्वी नसलेली प्रथा नव्या पिढीला आकर्षण करणारी आहे. त्यामुळे आता लग्नाच्या वाढदिवसाबरोबर च नव्या पिढीने monthly Anniversary साजरी करण्याचाही नवा पायंडा पाडला आहे. आज आमच्या लग्नाला एक दोन र्वष झाली की आम्हाला इतकं आश्चर्य वाटते की जणू आम्ही एकमेकांना किती काळ सहन केलं किंवा आमचं एकमेकांवर किती प्रेम आहे , आमच्यासारखे इथे कुणीच नाही, world's best partner अशा tagline लावून आपण मोकळे होतो . तुम्ही कधी तुमच्या वडिलांना तुमच्या आईशी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं बोलताना पाहिलं आहे का?
नाही पाहिलं ना, मग त्यांच प्रेम नाही का एकमेकांवर ? , पण ते एवढं आहे म्हणुन बोलून दाखवत नाहीत . त्यांच प्रेम आपल्या पिढीप्रमाणे उथळ नाही, संथ वाहणारा झरा आहे आपल्या मुलांच्या भविष्याच नियोजन करण्यात त्यांची इतकी र्वष गेली , मुलांसाठी एकमेकांनी काय त्याग करायचे आहेत हे ठरविण्यात त्यांची इतकी र्वष गेली की आज त्यांची 42 वी Anniversary आहे , आणि ते स्वतःसाठी जगले नाहीत याच त्यांना आपल्यासारखे फार मोठे आश्चर्य वाटत नाही. आजही आपणच त्यांच्या प्रथम प्राथमिकता आहोत . आपल्यासारख्या सुख सुविधा त्यांच्या काळात त्यांनी अनुभवल्या नाहीत तरीही इतका काळ ही साथ टिकून आहे म्हणजे.... इतकी तडजोड करून ही आपण आपल्या जोडीदाराबरोबर आहे हे अत्युच्च प्रेमाचंच प्रतीक आहे.
माझ्या आई वडिलांची आज anniversary आहे आणि मी 35 वर्षांची आहे. आज फुललेला हा संसार मी सुद्धा फार जवळून पाहिला आहे.
हा संसार असाच वर्षानुवर्षे आनंदी राहो हीच देवाकडे प्रार्थना 🙏
❤️Happy Anniversary Mummy Pappa ❤️
💐🎂🎂🎂💐
No comments:
Post a Comment