रविवार चा दिवस होता , ऑफिस ला सुट्टी असल्याने दिव्या ने घर आवरायच ठरवले. समीर , दिव्याचा पती कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने स्वयंपाक न करताच ती कामाला लागली . अचानक घर आवरताना तिला आठवलं मागच्या वेळेस जेंव्हा घर आवरले तेव्हा मई (दिव्या ची नणंद ) होत्या मदतीला.मनातच स्मित हास्य करून तिने काम आवरून मई ला फोन करू असे ठरवले आणि आवरणयात मग्न झाली.
कोणती वाईट इच्छा घेऊन ऊगवला होता तो दिवस कोण जाणे की दिव्याला त्या दिवशी मई ची सतत आठवण होऊन सुद्धा ती कामात व्यस्त राहिल्याने फोन लावू शकली नाही . आणि त्या वाईट दिवसातील अत्यंत वाईट बातमी मिळाली.
मई ला तिच्या सासरच्या माणसांनी हुंडया साठी जाळून मारले. दिव्या चे हात पाय सुन्न , विश्वास बसेना , काय करावे सुचेना , समीर नव्हता आणि त्याचा फोनही लागेना. अस काही दिव्या पहिल्यांदाच अनुभवत होती आणि जगातील वाईट माणसे कोणत्या थराला जाऊ शकतात याचा विचार ती करत होती. दिव्या च्या लग्नानंतर ती मई सोबत 6 महिने राहिली होती. त्यामुळे दोघीमधील विषेश जिव्हाळ्याचे नाते तयार झाले होते. अंतिम संस्काराला समीर वेळेत पोहचू शकला नाही. भाऊ-बहीणीच नातं फार प्रेमाच होतं.
इतकी गुणी , मुलगी, देखणी , अत्यंत चुणचुणीत मई फक्त एका चुकीने गेली ती म्हणजे आईवडिलांनी सहन करायचच शिकवले , कारण तु मुलगी आहेस , सोशीक बन तर आयुष्य आहे .सासरच्यांनी कितीही त्रास दिला तरी तसच सहन करायचे इथेच चुकतो आपण , मुलगी म्हणून तिने कायकाय करावे आणि काय करू नये याचा पाढाच तयार करतो.
मई तर गेली , आईवडील भाऊ - बहीण सावरले असतील यातुन पण आजही मईचा मारेकरी मोकाट फिरतोय .अजुन कोर्टात केस चालूच आहे. तपासानंतर त्याचे पहिल्यांदाच एक लग्न झाल्याचे उघड झाले. म्हणजे ही माणसे माणसे नाहीत . त्यांना लग्न म्हणजेही पैसे कमावण्याचे साधन वाटते . आता त्याच पहिल्या पत्नी बरोबर संसार थाटून दोन मुलांना जन्म दिला. पण एक निष्पाप बळी गेला आहे. आणि असे रोज किती जातात?
बेटी बचाओ, बेटी पढाओ हे फार चांगल समजल आहे लोकांना खुप छान योजना आहे ही सरकार ची पण त्या लाडली ची मई होऊ नये . महिला आज अंतराळात पोहचली पण ही संख्या सर्वच क्षेत्रात मुठभर आहे . जोपर्यंत सर्वात शेवटची स्त्री सुरक्षित, सुशिक्षित, आणि स्वावलंबी, होत नाही तोपर्यंत रोज एक मई तयार होईल . हळदी कुंकवाचे कार्यक्रम बास झाले आता. पहिल्यांदा हातात धरलेली लेखणी जोपर्यंत वेळ प्रसंगी एकटे राहण्याचे, लढण्याचे बळ देत नाही तोपर्यंत थांबू नका.
2012 वर्ष चालू होत ही घटना घडली तेव्हा डाॅ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी 2020 भारत महासत्ता होणार असा दृष्टीकोन लोकांसमोर मांडला होता . आज हा ब्लॉग वाचल्यानंतर सुशिक्षित म्हणवून घेणाऱ्या जनतेने एक गोष्ट नक्की करावी मी हुंडा घेणार नाही व त्या द्वारे समाजात सकारात्मक संदेश देण्यास सुरुवात करेन . उशिरा का होईना आपला देश महासत्ता होईल.
Join my telegram channel 👇👇👇👇 @kaviaratisanjay
No comments:
Post a Comment