Thursday, May 16, 2024
आमच्या आई वडिलांची 42 वी Anniversary
Friday, May 3, 2024
आरतीच्या लेखणीतून
✨✨आम्हा बायकांना नवरे आमच्या बापानं त्यांच्या घरी पाठवलेलं वादळ समजतात पण तस नाही ओ ते , थोड उलटं आहे, आम्ही आमच्या मनात येणारी कितीतरी वादळे थोपवून धरल्यामुळे तुमच घर आज तग धरून आहे हे विसरू नका. ✨✨🙏
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
प्रत्येक गोष्टीचे जसे प्रकार असतात तसेच नात्याचेही दोन प्रकार असतात . एक इमोशनल आणि एक प्रोफेशनल. 🍃🥀🍃 इमोशनल नात्याला कधीही प्रोफेशनल कसं राहायचं हे शिकवायला जाऊ नका नाहीतर ते नातं कधी प्रोफेशनल होऊन जाईल हे तुम्हालाही कळणारही नाही . इमोशनल नात्याला फक्त प्रेम , वेळ आणि द्यावा वाटला तर थोड्या सन्मानाची अपेक्षा असते . याउलट प्रोफेशनल नातं आपण इतकं जास्त जपतो जितकी गरज नसते . कारण एकच आहे "पैसा " . प्रोफेशनल नात्यात आपण शब्द जपुन वापरतो कारण एकच "पैसा" . इमोशनल नाती ही झाडावर आलेल्या फुलांप्रमाने असतात , त्यांच्या मर्जीशिवाय त्यांना तोडल तरी चालते, सुकली की फेकून दिली तरी चालते , हातात आहेत म्हणून चुरगाळली तरी चालते , हार करताना सुई टोचली तरी गप्प राहतात , एखाद्याचा सुगंध नाही आवडला, रंग नाही आवडला असे म्हणून पाहा तरी चालते . पण खरी शोभा त्यांच्यामुळेच आहे.
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
तुमच सगळं सुरळीत सुरू आहे असं तुम्ही जगाला दाखवत असाल तर मग ते तस् नाहीये , सगळं सुरळीत सुरू आहे कारण मनाने त्याचे दरवाजे बंद केले आहेत, विचारांची टकटक त्या दारावर सुरूच आहे पण मनाने दाद द्यायची नाही हे निश्चय पूर्वक ठरवले आहे. आता हे दार तेव्हाच उघडेल जेव्हा आयुष्याचा लेखाजोखा ठरवण्याची वेळ आली असेल, मागे उरेल फक्त एक खंत दरवाजा घट्ट लावून घेतल्याची 😑😑😑
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
पाच दहा मेडल मिळाली , चांगली नोकरी , चांगल पॅकेज, फक्त एवढंच म्हणजे यश असं कुठे लिहून ठेवलंय . रोज स्वतःच कालच्यापेक्षा आज better version तयार करणं म्हणजे सुध्दा यश .
🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀🌿🥀
पुर्ण अपुर्ण
थकले आहे मी महिला दिवस साजरे करून . महिला दिन नुसतेच नकोत शुभेच्छा देण्यापुरते , कपडे आणि वस्तूंवर सुट देण्यापूरते , सेल्फी काढून फ...
-
महिला दिनाला एक शतका पेक्षा जास्त इतिहास आहे. १९०८ साली दक्षिण अमेरिकेतील काही महिलांनी मतदानाचा हक्क , कामाचे तास , वेतन...
-
कधी वाटते..... व्हावे जिजाऊ, फिरवून संस्कारांची तलवार 🗡🗡🗡 घडवावा पुन्हा एक शिवाजी.....🔥🔥 🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟🌟 ...
-
Happy Anniversary Mummy Pappa लग्नाचा वाढदिवस ही पूर्वी नसलेली प्रथा नव्या पिढीला आकर्षण करणारी आहे. त्यामुळे आता लग्नाच्या वाढदिवसाबरोबर...