Friday, March 7, 2025

 थकले आहे मी महिला दिवस साजरे करून . 


 महिला दिन नुसतेच नकोत 

शुभेच्छा देण्यापुरते ,  

कपडे आणि वस्तूंवर सुट देण्यापूरते , 

सेल्फी काढून फोटो ठेवण्यापुरते. 


ताई ! अशा हाकेला घाबरते मी आता, 

मला ताई म्हणणारा माझा सख्खा भाऊच खरा , 

ताई म्हणून स्वारगेट बसस्थानकावर अब्रू लुटणारा गाडे असो

वा लग्नाचे अमिष दाखवून फ्रीज मध्ये

 श्रद्धा चे तुकडे ठेवणारा अफजल असो .


आम्ही आता फक्त आमच्या शिवरायांना शोधत आहोत . 


शिवराय आता फक्त नाटक , सिनेमा च्या रुपात दिसतात , 

दाढ्या वाढवून , चंद्रकोर लावून , सोंग आणून ,

 रस्त्याने मोठे झेंडे लावणारे शिवराय नको आहेत आम्हाला , 

ताई शब्दाचा अर्थ जपणारे आमचे महाराज आम्ही शोधत आहोत 


महाराष्ट्र शिवरायांचा आहे , पण शिवरायांचे विचार ..... 

 

आम्ही शिवबाला शोधतोय....    

                                                   

                                        आरती 

पुर्ण अपुर्ण

 थकले आहे मी महिला दिवस साजरे करून .   महिला दिन नुसतेच नकोत  शुभेच्छा देण्यापुरते ,   कपडे आणि वस्तूंवर सुट देण्यापूरते ,  सेल्फी काढून फ...