संक्रांतीचा सण झाला तेव्हा मी पहिल्यांदाच या सणाला गावी होते. सणाच्या आधी नटाफटा करण्यात व्यस्त असतो आपण . मी पण सगळं व्यवस्थित पार पडावं याच अपेक्षेत होते . तस ते पार पडलं सुद्धा. पण एक मनाला, विचाराला न पटणारी बातमी कळली आणि तेव्हाच मनापासून वाटले महात्मा फुले गप्प बसले असते तर ..... ? आंबेडकर गप्प बसले असते तर .....?
आता संक्रांतीचा दिवस उजाडला आणि आम्ही नटून थटून मंदिरात गेलो. सर्व स्त्रियांच्या भेटीगाठी हळदी कुंकू झाले. आम्ही मंदिरातून निघण्याच्या तयारीत होतो एवढ्यात बायका कुजबुज करीत आहेत असे ऐकून ... मी विचारले काय झाले? तिकडून उत्तर आले . खालच्या जातीतील (SC)बायका येतील आता त्यांच्याकडून हळदी कुंकू लावू नये आणि मंदिरात त्यांनी रुक्मिणी ला वाहिलेले चुडे घेऊ नयेत. त्यासाठी ते पुजारी आधीपासून जमलेले चुडे वेगळीकडे काढू लागले. प्रश्न हा होता कुठे आहे कलम 17 , काय काम आहे 1955 च्या अस्पृश्यता निवारण कायद्याचे ? फुले, आंबेडकर, शाहू कुठे कमी पडले ? आयुष्य पणाला लावले ? तरी....... अशा परिस्थितीत फक्त महापुरुषांचे स्मरण होते आणि किती कष्ट वेचले त्यांनी समाजात समानता रूजवणयासाठी पण समाज ही त्यांना ताठपणे जगू देत नाही ..... आणि मुळात अन्याय सहन करत जगणे या लोकांनी अंगी पाडुन घेतल्याने...समाज अन्याय करत राहिला ....
खरा प्रश्न तर हा आहे की त्या स्त्रिया रूक्मिणी ला हळदी कुंकू लावू शकतात तर तुम्ही कोण रूक्मिणी पेक्षा अशा किती महान आहात याचा जरा विचार करा .
.................. शोकांतिका
😌😌😌😌